Aurangabad news  
छत्रपती संभाजीनगर

Coronavirus : आता कोेरोना रुग्णावर घरीच होणार उपचार 

मधुकर कांबळे

 
औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग थांबण्याऐवजी दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. हा ताण कमी करण्यासाठी आता अतिसौम्य लक्षणे असलेल्या किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना त्यांच्या संमतीनुसार होम क्वारंटाइन केले जाणार आहे. राज्य सरकारनेच तसा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. परिणामी, अशा कोरोना रुग्णांना यापुढे घरीच उपचार दिले जाणार आहेत.

शहरात कोरोनाची लागण झाली. त्यावेळी सुरवातीला मोजकेच रुग्ण आढळले होते. मात्र, दीड महिन्यात झपाट्याने संसर्ग होत गेला. यामुळे शासकीय यंत्रणा अपुरी पडत आहे. सध्या घाटी रुग्णालय, मिनी घाटी व महापालिकेचे कोविड केअर सेंटर रुग्णांनी फुल्ल झाले आहेत.

औरंगाबादप्रमाणे राज्यातील इतर शहरांमध्ये अशाच पद्धतीने कोरोना रुग्ण प्रचंड संख्येने आढळून येत आहेत. त्यामुळे आता सरकारने शासकीय यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य अथवा अतिसौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना हॉस्पिटलऐवजी त्यांच्याच घरी ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

या आहेत सूचना 

राज्य सरकारच्या वतीने सर्व महानगरपालिका, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबत लेखी आदेश दिले आहेत. यामध्ये म्हटले आहे की, लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य वा अतिसौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना त्यांच्या संमतीनुसार होम क्वारंटाइनचा पर्याय उपलब्ध करून देता येईल.

मात्र, त्यासाठी संबंधित रुग्णांच्या घरी त्यांच्या क्वारंटाइनसाठी तसेच कुटुंबातील व्यक्तींकरिता अलगीकरणासाठी योग्य सुविधा उपलब्ध असाव्यात. घरी दिवसरात्र काळजी घेणारी व्यक्ती उपलब्ध असावी. त्याने मोबाईलवर आरोग्य सेतू अप डाऊनलोड करावे व ते सतत कार्यरत असेल याविषयी दक्ष राहावे, असे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. 

किती दिवस होम क्वारंटाइन? 

होम क्वारंटाइन केलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना क्वारंटाइनमधून कधी मुक्त करावे याविषयीही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला लक्षणे सुरू झाल्याच्या १७ दिवसांनंतर किंवा लक्षणे नसतील तर चाचणीसाठी नमुना ज्या दिवशी घेतला असेल तेथून १७ दिवसांनंतर आणि मागील १० दिवसांपासून ताप येत नसेल तर होम क्वारंटाइन व्यक्तीस मुक्त करावे. होम क्वारंटाइनचा काळ संपल्यानंतर पुन्हा कोविड चाचणी करण्याची आवश्यकता नाही, असेही शासनाने म्हटले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

यापूर्वी एकनाथ शिंदेंनी देखील GR दिला होता मग आता नवीन काय? मराठ्यांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर! सगेसोयरे पण मार्ग दुसरा

Pune News : आयटी कंपनीच्या संचालकावर फसवणुकीचा दुसरा गुन्हा दाखल, पोलिसांचा शोध सुरू

दुर्दैवी घटना ! 'शेतजमिनीतील खड्यात आढळला महिला आणि बालिकेचा मृतदेह'; कासारवडवली येथील घटना

US Open: लेकीला दिलेलं प्रॉमिस नोव्हाक जोकोव्हिचने केलं पूर्ण, सामना जिंकताच 'Soda Pop' डान्स Video Viral

GST Meeting: काय स्वस्त अन् काय महाग होणार? GST परिषदेच्या बैठकीत मध्यमवर्गाला दिलासा मिळणार की धक्का बसणार?

SCROLL FOR NEXT